डॉ.कुमार लोंढे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिल्ली च्या राष्ट्रीय सचिवपदी निवड : राष्ट्रीय अध्यक्ष इन्द्रेश गजभिये यांनी केली नियुक्ती..!

पिलीव/प्रतिनीधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गारवाड- चांदापुरी या ग्रामीण भागातील डॉ.कुमार लोंढे यांची दिल्लीच्या समितीवर राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,डॉ.आंबेडकर परिनिर्वाण भूमी सन्मान कार्यक्रम समिती (रजि) दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष,मध्य प्रदेश सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री इन्द्रेश गजभिये यांनी डॉ.कुमार लोंढे यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन स्मारक समितीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करून अधिकृत पत्र दिले.

     या राष्ट्रीय समिती मध्ये सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले,पूर्व केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटीया,पूर्व लोकसभा उपाध्यक्ष चरणजीतसिंह अटवाल,केंद्रीय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल,माजी खासदार पी एल पुनिया,डॉ.उदित राज,सत्या बहन,अनुसूचित जाती आयोगाचे पूर्व अध्यक्ष एच हनुमनथप्पा,पूर्व मंत्री बबन घोलप,राष्ट्रीय संयोजक टी एम कुमार इ मान्यवरांची राष्ट्रीय कमिटी असून यामध्ये डॉ.कुमार लोंढे यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली आहे.
  डॉ.कुमार लोंढे गेली पंधरा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून वैद्यकीय, आर्थिक,शैक्षणिक, उद्योग,मानवाधिकार,लेखक,संपादक, आंदोलन, मोर्चे अशा सर्व आघाडीवर  कार्यरत असून वीस पेक्षा जास्त प्रादेशिक, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

या वेळी डॉ.कुमार लोंढे म्हणाले हा माझा सन्मान नसून माझ्या गावाचा, तालुक्याचा जिल्ह्याचा व घरावर तुळसीपत्र ठेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा,माय माऊली,शोषित समाजाचा,माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे.हे पद सर्व पदापेक्षा मला फार महत्वाचे वाटते.समितीच्या माध्यमातून दिल्ली येथे डॉ.आंबेडकर स्मारकासाठी 50 एकर जागा,महात्मा गांधी यांच्या राजघाट साठी जो कायदा आहे तसाच कायदा संसदेत पारित करणे व हे स्मारक जागतिक दर्जाचे कसे करता येईल यासाठी समितीच्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष इन्द्रेश गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *