पिलीवची सुनयना वेळापुरे झळकली राष्ट्रीय गुणवत्ता यादीत : राष्ट्रीय अभियांत्रिकी स्पर्धेत मिळविला प्रथम क्रमांक..!

पिलीव/सुजित सातपुते
राष्ट्रीय स्तरावर स्मार्ट इंडिया अंतर्गत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कु.सुनयना विजय वेळापुरे हिने प्रथम क्रमांक मिळवून पिलीव गावासह सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.शिक्षण खात्याच्या शिक्षण विभागातर्फे दर वर्षी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येते.यंदाच्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२ या ग्रॅन्ड फायनल स्पर्धेमधे क.भा.पा.विद्यालय पिलीव ची माजी विद्यार्थ्यीनी तसेच पिलीव ता.माळशिरस येथील रहिवासी कु.सुनयना विजय वेळापुरे हिने आपल्या संघासह प्रथम क्रमांक पटकावुन एक लाखाचे पारितोषिक जिंकले आहे.भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन स्वरुपात हि स्पर्धा होते.कु सुनयना वेळापुरे हीने या स्पर्धेमधे आपल्या टिम सोबत सहभाग घेतला होता.तिची निवड ग्रॅन्ड फायनल साठी झाली.’ई-वेस्ट मॅनेजमेंट’ या थीमवर सुधारीत अशा एम.एस.डब्लु.एस या प्रणालीचे तिने सादरीकरण केले.या मिळालेल्या यशामुळे सुनयनाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.माझ्या यशाचे सर्व श्रेय माझे मार्गदर्शक शिक्षक,माझे अजोबा,वडील व माझे काका यांना देत असून या यशाचे शिखर गाठण्यासाठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सुनयनाने माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *