कु.ऐश्वर्या संजयकुमार करडे हिचे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये उत्तुंग यश : विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील संजयकुमार शंकरराव करडे यांची कन्या कु.ऐश्वर्या संजयकुमार करडे हिने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आत्मनिर्भर भारत हिंदी स्पर्धा पारितोषक (SNDT) या उपक्रमात मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये दुसरा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीमध्ये नाव झळकिवले असून पिलीव गावच्या व माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील श्रीराम महिला महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. मला हे यशाचे शिखर गाठण्यासाठी माझे आजोबा तथा जिल्हा परिषदचे माजी आदर्श पुरस्कर्ते शिक्षक शंकरराव तुकाराम करडे व आज्जी अंगणवाडी शिक्षिका सुशीला शंकराव करडे व माझे मार्गदर्शक शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे ऐश्वर्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.ऐश्वर्याच्या या नावीन्यपूर्ण यशाबद्दल पिलीव पत्रकार संघ,अष्टविनायक गणेश मित्र मंडळ,गजवक्र सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून ऐश्वर्याचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. असून तिचे विविध स्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.