पिलीव येथील अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी तुषार उर्फ नानासाहेब जाधव तर उपाध्यक्षपदी प्रमोद पोकळमाने यांची सर्वानुमते निवड..!
पिलीव/सुजित सातपुते
काल गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:00 वाजता पिलीव येथील वैष्णवी कॉम्प्लेक्स येथे अष्टविनायक मंडळाच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत मंडळाचे संस्थापक श्री.अविनाश (दादा) जेऊरकर व मार्गदर्शक श्री.प्रकाश (आबा) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या प्रारंभी मंडळाचे माजी सचिव कै.भूषण मेथवडे व कै.अभिजीत जेऊरकर यांना सर्व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या अष्टविनायक गणेश मित्र मंडळ एसटी स्टँड पिलीव या नामांकित गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी तुषार उर्फ नानासाहेब जाधव यांची,उपाध्यक्षपदी प्रमोद पोकळमाने,सचिवपदी दीपक केसकर तर विसर्जन मिरवणूक प्रमुख म्हणून कैलास फाळके व तन्मय काळे, ढोल ताशा प्रमुख सुहास चव्हाण,अक्षय माने,सौरभ काळे व सूत्रसंचालक म्हणून जुबेर पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकीस ॲड.वैभव मेथवडे,शाम उपाध्ये,महेश रसाळ,लक्ष्मण भैस,गणेश सुर्यवंशी यांसह मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.नूतन पदाधिकाऱ्यांचा ॲड.वैभव मेथवडे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला व सर्व पदाधिकाऱ्यांसह सभासदांना शासनाचा प्रोटोकॉल पाळूनच गणेश उत्सव साजरा करावा अशी विनंती केली.