पिलीव येथील कै.अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चिमुकल्यांनी जोपासली रक्षाबंधनाची पूर्वापार परंपरा : संस्थेचे सर्वेसर्वा श्री.सागर सरगर यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक..!

पिलीव/सुजित सातपुते
राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो.बहीण भावाला राखी बांधते.राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत.भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते.हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे.या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते आणि याच परंपरेचा वसा धरून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री.सागर सरगर यांनी आज शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी आपल्या शाळेमध्ये चिमुकल्यांसह या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये अगदी लहानात लहान चिमुकल्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व पटवून सांगितले व शाळेतील लहान मुलींनी मुलांना व शिक्षकेंनी शिक्षकांना राख्या बांधून औक्षण करून या सणाचे महत्त्व व परंपरा जोपासली असल्याने पिलीवसह परिसरामध्ये या इंग्लिश स्कूलच्या उपक्रमाचे कौतुक होत असून श्री.सागर सरगर सर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *