विकासला जीवे मारण्याचा केला धडा परंतु पिलीव पोलिसांनी एका रात्रीत लावला छडा : आरोपींनी रस्त्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली असली तरी अनैतिक संबंधातूनच खून
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील विकास सोपान वाघमारे (वय 35) या विवाहित युवकाची शनिवारी संध्याकाळी 7:30 च्यादरम्यान आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता सुरज सर्जेराव वाघमारे व दाजीराम रंगनाथ वाघमारे दोघेही राहणार झिंजेवस्ती ता.माळशिरस यांनी काठीने व खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर, पाठीवर,छातीवर जोरदार मारहाण केल्यामुळे विकास सोपान वाघमारे हा जागेवरच मयत झाल्याची घटना घडली असल्याने पिलीव सह कुसमोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मयत विकासचे पाय व तोंड दोरीने बांधून पोटावर, पाठीवर,डोक्यावर,छातीवर प्रचंड मारहाण केल्याने संपूर्ण शरीर काळे निळे पडल्याचे आढळून आले.

सदरची घटना विकास वाघमारे आपल्या मालकीच्या कुसमोड हद्दीतील जमीन गट नं २३१/१/अ येथे विहीरीलगत पाणी देत असताना घडली आहे.विद्युत मोटार चालू करण्यासाठी संध्याकाळी आठच्या सुमारास मयत विकास गेला होता.बराच वेळ उलटून गेला तरी विकास परत आला नाही म्हणून पत्नीने फोन केला होता पण तो फोन उचलत नाही म्हणून शेजारच्या नातेवाईकाना कळविल्यानंतर विकास मृत अवस्थेत बांधावर पडलेला दिसला.सदरच्या घटनेची माहीती समजताच पिलीव औट पोस्टचे पोलीस हवालदार सतीश धुमाळ व अमित जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली त्यानी विकास वाघमारे हा मयत झाला असल्याचे घोषित केले व रितसर पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी माळशिरस येथे पाठविण्यात आले.

सदर घटनास्थळी अकलुजचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे,माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, हवालदार दत्ता खरात,व कणसे यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा करून मयत विकास यंच्या मृतदेहावर माळशिरस येथे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मयत विकास वाघमारे याच्या या हत्याप्रकरणी माहिती मिळताच झिंजेवस्ती येथील संशयीत सुरज सर्जेराव वाघमारे व दाजीराम रंगनाथ वाघमारे यांच्या विरोधात मयताचा भाऊ सुहास सोपान वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस तपासात आणखीन कांही आरोपीची नावे निष्पन्न होतील अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.एवढं मोठं धाडस व हात्या दोघं करु शकणार नाहीत.तपासात आणखी काय निष्पन्न होते का याकडे लक्ष लागलेले आहे.संशयीत आरोपी विरोधात भा.दं.वि.३०२ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमानुष मारहाण करून हात्या केल्याप्रकरणी सुरज सर्जेराव वाघमारे व दाजीराम रंगनाथ वाघमारे यांना अटक करून आज माळशिरस येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी पुढील तपासासाठी 12/8/2022 पर्यंत चार पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत.विकासचा खुन जमीनीच्या वादातुन झाला की इतर कारणावरुन याची चर्चा पिलीव परीसरात सुरु आहे. जमीनीत जाण्यासाठी रस्त्याच्या कारणावरूनवारंवार होणाऱ्या वादातून खून केल्याची कबुली संशयीत आरोपीनी दिली असली तरी परिसरात अनैतिक संबंधातून खून झाला असल्याची चर्चा केली जात आहे.