पिलीव येथील कर्मवीर विद्यालयाच्या शर्वरी बंगाळे हिचे उत्तुंग यश : विद्यालयासह पिलीव गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा..!

पिलीव /प्रतिनिधी
लोकनेते कै.ॲड जयसिंगराव नारायणराव जाधव उर्फ आबासाहेब यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त जनता विद्यालय मळोली येथे दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते . त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता .त्यातून इयत्ता 8 वी ते 10 वी या गटात सहभागी एकूण 168 विद्यार्थ्यांपैकी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीवची इयत्ता 8 वी अ मध्ये शिकणारी कु .शर्वरी विजय बंगाळे हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या गौरवात वाढ केली आहे .
बक्षिसाचे स्वरूप ३००१ रोख ( विभागून ) ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .कापसे सर तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शाळा व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *