पर्यावरण दिनानिमित्त संतुलित पर्यावरणासाठी माळशिरस वनविभागाकडून वन परीक्षेत्र अधिकारी(प्रा) दयानंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध ठिकाणी वृक्षारोपण

पिलीव/सुजित सातपुते
मानवाने प्रदूषणाला आळा घालणे तर आवश्यक आहेच परंतु हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात.संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान ३३ टक्के जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे.या बाबतची जाणीव करून देऊन वृक्ष- संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आजचा 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.याच उद्देशाने माळशिरस तालुका वन परीक्षेत्र अधिकारी(प्रा) दयानंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी लडकत एस.एम व वनरक्षक शैला भोजने यांच्या संकल्पनेतून आज पिलीव येथील गारवड रोड,जुने पोलीस स्टेशन परिसर व पिलीव घाट परिसर आशा तीन ठिकाणी विविध मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी इम्तियाज पठाण,सुजित सातपुते,शंकर वाघ,भारत जामदार,दादा मदने,जयवंत धांडोरे,महेंद्रा धांडोरे यासह पिली व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होत असल्याचे लडकत एस.एम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *