गोरडवाडीत फुलला भक्तीचा मळा

पिलीव प्रतिनिधी (रघुनाथ देवकर) :
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच कै नानासाहेब कर्णवर पाटील व त्यांचे बंधु तुकाराम कर्णवर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक( ठाणे शहर ) सोमनाथ कर्णवर पाटील आणि समस्त कर्णवर पाटील परिवाराने गोरडवाडी येथील निवासस्थानी भागवत सप्ताहाचे व इतर धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करून ह-भ-प गुरुभक्ती भूषण हरिहरनंदन महाराज (पिलीवकर) यांचे अमृतवाणीतून पुष्पवृष्टीचे अतिशय मार्मिक व जनजागृती पर आधारित असे किर्तन ठेवून अतिशय भक्तिमय वातावरणात कीर्तनाचा कार्यक्रम झाला. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वरोग निदान शिबीर ,नेत्र तपासणी शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते .या सर्व शिबिराला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पुष्पवृष्टी साठी व संपूर्ण कार्यक्रमासाठी परम पूज्य देवाजे मामा हेरवाडकर महाराज( प्रमुख बाळूमामा संतुबाई देवस्थान रूकडी माणगाव) यांचाही आशीर्वाद लाभला .या कार्यक्रमासाठी भव्यदिव्य असा सभामंडप घातल्यामुळे उन्हाळा असूनही भरपूर प्रमाणात सावली उपलब्ध असल्याने व पिण्याच्या पाण्याची उत्तम प्रकारे सोय असलेले कीर्तन सेवा संपेपर्यंत सर्वांना श्रवणाचा लाभ मिळाला. नंतर मा. बाळासाहेब कर्णवर पाटील व सौ शोभा कर्णवर पाटील यांच्या हस्ते पूजा करून सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धार्मिक सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेशागिरी राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाशराव पाटील , माजी जि प अध्यक्ष फत्तेसिंग माने पाटील मदनसिंह मोहिते पाटील. वास्तविक महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते गावच्या सरपंचांपर्यंत लोकप्रतिनिधींनी हजेरी दाखवली होती. सदर कार्यक्रमांमुळे गोरडवाडी व परिसरामध्ये भक्तीचा मळा फुलला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *