संग्रामसिंह जहागीरदार यांचे हस्ते भाजपा विविध सेलच्या निवडीची नियुक्ती पत्र वाटप : नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्त्यांचा जल्लोष..!
पिलीव प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील यांच्या आदेशाने व भाजपा तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांचे सूचनेनुसार भाजपाचे पिलीव भागातील ज्येष्ठ नेते व कृषी व पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद सोलापूर चे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांचे अध्यक्षतेखाली पिलीव येथील भाजपा विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे कार्यक्रमामध्ये देण्यात आली यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख श्री रघुनाथ देवकर यांच्या प्रास्ताविका नंतर मा.संग्रामसिंह जहागिरदार, उपसरपंच संजय आर्वे ,भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने,जयसिंह जहागीरदार, पांडूसिंग जनवर, मा. ग्रा पं सदस्य अविनाश जेऊरकर, प्रकाश जाधव, दत्तात्रय बोडरे ,उमेश बोडरे, डॉ सचिन मदने यांच्या हस्ते सौ सुषमा अरुणसिंग जामदार महिला मोर्चा पिलीव अध्यक्ष, राजेंद्र कराडे शहराध्यक्ष, नवनाथ पिसे ओबीसी सेल अध्यक्ष, प्रमोद पाटील किसान मोर्चा अध्यक्ष, महेश बोडरे युवा मोर्चा अध्यक्ष याप्रमाणे निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी नितीन गबाले, मोहसिन शेख ,समशेर राजपूत, अरुण सिंग जामदार ,भैय्या जामदार ,नानासाहेब मदने, पत्रकार प्रमोद भैस,तानाजी लोखंडे, आबा बनसोडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.