पवार हॉस्पिटल तोड-फोड प्रकरणी इतर आरोपी मोकाटच : डॉक्टर संघटनेचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन..!
पिलीव प्रतिनिधी-
पुणे येथे 12 मे रोजी झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास निमंत्रण न दिल्याने निमगाव येथील आप्पासाहेब मगर ,नीलेश मगर व अण्णा देवकर यांच्यासह इतर 15 ते 20 जणांनी पिलीवच्या पवार हॉस्पिटल वर हल्ला करून महिला डॉक्टरांना शिवीगाळ करून हॉस्पिटलचे 75 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशन येथे 12 मे रोजी रात्री उशिरा तक्रार दाखल केली होती परंतु घटना घडूनही आठवडा उलटला तरी 3 आरोपी वगळता पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली नाही यामुळे इतर आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी याबाबत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अकलूज शाखेच्यावतीने अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,पिलीव ता माळशिरस येथे 12 मे रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान निमगाव येथील आप्पासाहेब मगर ,अण्णा देवकर व नीलेश मगर यांच्यासह इतर10 ते 15 जणांनी पिलीव येथील पवार हॉस्पिटल वर समूहाने हल्ला करून , ड्राव्हर मधील 20 ते 25 हजार नेऊन हॉस्पिटलचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान केले होते 12 मे रोजी तक्रार दाखल केली होती यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून इतर आरोपीं मोकाट असल्यामुळे हल्ल्यातील इतर आरोपींना तात्काळ अटक व्हावी अन्यथा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा या निवेदनात देण्यात आला आहे अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी अकलूज डॉक्टर संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते