पिलीव येथील नामांकित अशा पवार हॉस्पिटलची तोडफोड:महिला डॉक्टरला धक्का-बुक्की तर रुग्णांच्या नातेवाइकांना मारहाण..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव-पंढरपूर रोडवर अनेक दिवसांपासून कार्यरत असणाऱ्या नामांकित आशा पवार हॉस्पिटलची काल निमगा (म) येथील आप्पासाहेब ज्ञानदेव मगर,अण्णा देवकर,निलेश मगर यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी हॉस्पिटल मध्ये घुसून हॉस्पिटलची तोडफोड केली व डॉक्टर वंदना पवार यांना धक्काबुक्की करून पेशंटच्या नातेवाईकांनाही मारहाण केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.सदर प्रकरणाची पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पवार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.दिलीप मारुतीराव पवार यांचे बंधू प्रा.हनुमंत मारुतीराव पवार यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते हे पुस्तक लिहिले असून सदर पुस्तकाचा काल 12 मे रोजी पुणे येथे प्रकाशन सोहळा होता.सदर प्रकाशन सोहळ्यास आम्हाला का सांगितले नाही म्हणून आप्पासाहेब मगर यांनी डॉ.दिलीप पवार यांना फोन करून शिवीगाळ केली व निमगाव येथून पिलीव येथे येऊन पवार हॉस्पिटलची तोडफोड केली.सदर ठिकाणी डॉक्टर वंदना पवार उपस्थित होत्या तोडफोड होत असताना त्यांनी वरील आरोपींना डॉक्टर आल्यावर बोला,शांत रहावा,तोडफोड करू नका अशी हात जोडून विनंती केली असता मॅडमला धक्काबुक्की केली.त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी माझे पेशंट आत मध्ये आहे काही तरी इजा होईल ते घाबरले आहे तोडफोड करू नका अशी विनंती केली असता पेशंटच्या नातेवाईकांनाही सदर आरोपींकडून मारहाण करण्यात आली.सदरची घटना ही अगदी निंदनीय असून वरील आरोपींना जास्तीत जास्त अशी कठोर शिक्षा लागावी अशी पवार कुटुंबियाकडून मागणी होत आहे.या घटनेच्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या टीमने वेळीच घटनास्थळी भेट दिली व आरोपींना ताब्यात घेऊन माळशिरस पोलिस स्टेशनला रवाना केले.सदर प्रकरणी वरील आरोपींवर 452,380,427,143,147,149,504,506 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती वैद्यकीय सेवा अधिनियम 2010 संस्था आशा गंभीर स्वरूपाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *