पिलीव येथील कर्मवीर शाळेमध्ये “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन..!


पिलीव/प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने ‘हर घर तिरंगा ‘ उपक्रमा अंतर्गत गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन वसावे सर यांनी केले होते.या प्रशमंजूषेत सी. व्ही. रमण गट, कर्मवीर भाऊराव पाटील गट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गट, पायथागोरस गट व डॉ ए पी जे अब्दुल कलाम गट असे 5 गट होते. त्यामध्ये एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील कर्मवीर भाऊराव पाटील गटातील सहभागी विद्यार्थी राजवर्धन सचिनकुमार पाटील (इ. 5वी) , कु.शरयू अविनाश देशमुख ( इ. 6 वी) , जय भुजंगराव शिंगाडे ( इ. 7 वी) , कु. शर्वरी विजय बंगाळे ( इ. 8 वी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . गोंजारी सर , प्रभारी पर्यवेक्षक श्री. पाटील सर , शाळा व्यवस्थापन समिती व विकास समिती, स्थानिक स्कूल कमिटी यांच्यातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.स्पर्धेचे सूत्रसंचलन श्री माने सर यांनी तर गुणांकन श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *