कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कूल या संस्थेच्या माध्यमातून सागर सरगर हे भविष्यातील अधिकारी घडवत आहेत – प्रा.गणेश माने
पिलीव/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकरराव सरगर बहुउद्देशीय संस्थेच्या कै.अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक शिक्षक मेळावा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्राचार्य सागर सरगर हे होते.प्रारंभी सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, यांच्या प्रतिमेचे पूजन पिलीव ग्रामपंचायतचे सरपंच नितीन मोहिते-माळी यांच्या हस्ते व दिपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रा.सागर सरगर,सरपंच नितीन मोहिते-माळी,प्रा गणेश माने,बचेरी ग्रा.पं सदस्य विश्वजित गोरड आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देऊन गुणवत्ता वाढीसाठी कै.अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूल करीत असलेल्या प्रयत्नांची उपक्रमांची पालकाकडून प्रशांसा करून काही गुणवत्ता वाढीसाठी उद्बोधक अशा शैक्षणिक स्वरूपाच्या सूचना करण्यात आल्या.यावेळी पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद साधण्यात आला.सुप्रसिद्ध वक्ते समाज प्रबोधनकार प्रा.गणेश माने यांनी पालक शिक्षक व समाज यांच्या जबाबदारी विषयी प्रबोधन पर व्याख्यानात स्वतःचे अनुभव प्रसंग व विद्यार्थ्यांनी करावयाच्या ध्येयाच्या दृष्टीने भविष्यातील करिअर घडवण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून संस्थेचे सर्वेसर्वा सागर सरगर हे पिलीवसह परिसरातील भविष्यातील अधिकारी घडवत असल्याचे प्रा.माने यांनी सांगितले.यावेळी सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक सागर कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक राजेंद्र धांडोरे यांनी व्यक्त केले.या पालक शिक्षक मेळाव्याचे नियोजन संस्थापक प्रा.सागर सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या श्रीमती अंजली उपाध्ये व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी उत्कृष्ट पणे नियोजन करून मेळावा संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले.