महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणार्‍या भव्य रक्तदान शिबिरास पिलीवसह परिसरातील जास्तीत-जास्त लोकांनी रक्तदान करून सहकार्य करावे – शुभजीत नष्टे

पिलीव/प्रतिनिधी
जगत ज्योती,युगप्रवर्तक,समता नायक,स्त्री-उद्धारक,क्रांतिकारी अंधश्रद्धा निर्मूलक,लोकशाही जनक,विश्वगुरू,महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शनिवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पिलीव येथील मेन पेठेतील खंडोबा मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.तरी सदर रक्तदान शिबिरामध्ये पिलीवसह परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे वीर शैव लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शुभजीत नष्टे यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पिलीव परिसरातील लोकांना नम्र असे आवाहन केले आहे.सदरच्या रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकातील आधुनिक विचारसरणीचे क्रांतिकारक व विज्ञानवादी संत होते. बसवेश्वर महाराजांचा जन्म कर्नाटकातील असला तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात बत्तीस वर्ष त्यांनी वास्तव केले आहे.रक्तदान हेच श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे.आणि हेच खरे महाराजांना अभिवादन ठरेल असेही नष्टे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *