सद्गुरूवर होणारे आरोप बिनबुडाचे : सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा काटा खोटा सिद्ध करणारास दहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर – रोहित सर


पिलीव/सुजित सातपुते
श्री श्री सद्गुरु साखर कारखाना लिमिटेड श्रीनगर राजेवाडी ता.आटपाडी जि.सांगली हा साखर कारखाना सद्गुरु श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आशीर्वादातून व प्रेरणेतून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे फायदा-तोटा याचा विचार न करता जनहित जपण्याच्या त्यांच्या मुळतत्वानुसार गेली दहा वर्षापासून सदर चा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आलेलो आहे.मध्यंतरीच्या काळात काही असंतुष्ट नाराज घटकांनी हेतुपुरस्सर कारखान्याचा काटा मारला जातो.या खोट्या गोष्टीने चांगला चालत आसलेल्या कारखान्याची हेतुपुरस्सर बदनामी चालवली असून चांगल्या चाललेल्या कारखान्याला या खोट्या गोष्टीने गालबोट लावण्याच्या प्रयत्न केला आहे.मात्र आमचा कारखाना कसल्याही प्रकारे कोणालाही फसवत नसून कधीही काटा मारी किंवा कमी वजन दाखवीत नाही.कारण वजन काटा हा संगणीकृत असल्याने आम्ही कधी काटा मारी करण्याचा प्रयत्न करीत नाही.आम्ही बाहेर पाठवलेली साखर व बाहेरून घेतलेल्या वस्तू याच काट्यावर वजन करून वजनाची पडताळणी करीत असतो मात्र जर कोणी आमचा कारखान्याचा काटा खोट असल्याचे सिद्ध करील त्याला कारखाना समारंभपूर्वक दहा लाख रुपयाचे बक्षीस देईल अशी घोषणा साखर कारखान्याचे स्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत चिफ फायनान्स ऑफीसर रोहित सर यांनी जाहीर केले आहे.पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी पुढे सांगितले की चालु 2021-2022 मध्ये कारखान्याने नऊ लाख 5000 एवढे मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्याची अधिकृत सभासद संख्या 13146 एवढी असून चालू वर्षी कारखान्याकडे 20146 हेक्टर वर ऊस लागवडीची नोंद करण्यात आली होती.सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी अधिकृत नोंदणी प्रमाणे करण्यात आली आहे.अपवादात्मक नैसर्गिक परिस्थितीत काही शेतकऱ्यांची ऊस तोड नंतर केलेली आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर पंधरा दिवसाच्या मास्टरप्रमाणे उसाचे गाळप झालेल्या उसाचे बिल त्यांच्या बँक खात्यावर नियमितपणे जमा केले जात असून चालू वर्षी झालेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रमात थोडासा विस्कळीतपणा आला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला याचा बोध घेऊन पुढील वर्षीच्या हंगामात यामध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन ऊसतोड कार्यक्रम ठरविला जाईल.बाहेरच्या राज्यातील ऊसतोड कामगार वाहने व टोळी असल्याने व त्या त्या राज्यातील होळी सारखा सण असल्याने त्या भागातील सर्व ऊस तोड कामगार होळीच्या सणानिमित्त आपापल्या गावी निघून गेल्यामुळे ऊस तोड कार्यक्रमात विस्कळीतपणा आला होता.पुढील वर्षी यात सुधारणा करून दुरुस्त्या केल्या जातील व नोंदणी प्रमाणे ऊस तोडणी आपल्या भागातील ऊस तोडण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. उसाचे वाढते उत्पादन लक्षात घेता पुढील वर्षापासून एका शेतकऱ्याचा अडीच हेक्‍टर एवढ्याच उसाची नोंद घेऊन नियोजनेप्रमाणे ऊस तोडला जाईल याची त्यांनी खात्री दिली.श्री श्री रवि शंकर महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने त्यांनी घालून दिलेले आदर्श संस्कार आचार विचार व त्याप्रमाणे स्वतःला झळ सोसा पण इतरांच्या घामाच्या कष्टाचे शोषणकरू नका या तत्त्वाप्रमाणे हा कारखाना कायमच शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील राहिल.चांगल्या सोयी सुविधा दिल्या जातात व जातील याची त्यांनी हामी दिली हा कारखाना कायमच शेतकऱ्यांचे हित जोपासत राहील याची ग्वाही रोहित सर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी मळोली व तांदूळवाडी या भागातील शेतकऱ्यांनी दुसऱ्या वजन काट्यावर वजन केलेल्या ऊसाच्या पावत्या दाखवून कारखान्याने केलेल्या वजनात व बाहेर केलेल्या वजनात काहीही फरक नसल्याचे आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *