पिलीव येथे सालारखान पठाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबीराचे व अन्नधान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील संग्राम दोस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष सालारखान फिरोजखान पठाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ 17 एप्रील रोजी सकाळी 9 वाजल्यापासून अहील्यादेवी होळकर चौकातील गणेश मंदीरात रक्तदान शिबीराचे संग्राम दोस्ती मंडळ,जिवनदादा गुरव मित्रपरिवार,जिगर ग्रुप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिलीव शहर,विरशैव लिंगायत समाज पिलीव व मुस्लीम समाज पिलीव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.यावेळी रक्तदात्यास आर्कषक भेट वस्तू देण्यात येणार आहे.तर याच दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळेत जिवनदादा गुरव मित्रपरिवार व मोरया गणेश मित्र मंडळाच्यावतीने गरजूंना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे.