पिलीव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जहागीरदार पार्टीच्या सौ.अनिता अविनाश जेऊरकर विजयी : संग्रामसिंह जहागीरदार यांचे विश्वासू जेऊरकर यांची हॅट्रिक..!

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वॉर्ड क्रमांक दोनच्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी जहागीरदार पार्टीच्या उमेदवार सौ.अनिता अविनाश जेऊरकर या १२२ मतांनी विजयी झाल्या असल्याचे आज निकालातून जाहीर झाले.या पोटनिवणुकीसाठी जहागीरदार पार्टीच्या वतीने सौ.अनिता अविनाश जेऊरकर तर विरोधी नागरी अघाडी पार्टीतून सौ.ज्योती सचिन भैस यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.

या वॉर्डमधील मतदान प्रक्रिया काल मंगळवार दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली होती.या वॉर्डमध्ये एकूण मतदान १००२ असून या वेळी एकूण 717 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यापैकी सौ.अनिता अविनाश जेऊरकर यांना 416 मते पडली तर सौ.ज्योती सचिन भैस यांना 294 तर नोटाला 7 मते आहेत.अशा रितीने सौ.अनिता अविनाश जेऊरकर यांनी १२२ मतांनी विजयाची बाजी मारली असून
यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.जहागीरदार पार्टीचे सर्वेसर्वा तथा माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार व सर्व कार्यकर्त्यांनी पार्टीच्या वतीने सौ.अनिता अविनाश जेऊरकर यांचा सत्कार केला.संग्रामसिंह जहागीरदार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे श्री.अविनाश जेऊरकर यांच्या निस्वार्थी व स्वाभिमानी बाण्यानेच हा विजय खेचून आणल्याचे पिलीवकरातून चर्चिले जात असून जेऊरकर दांम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *