दादा शिंगाडे यांच्यासाठी साम,दाम,दंड,भेद यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करू – धैर्यशील मोहिते-पाटील

पिलीव/सुजित सातपुते
सत्तेसाठी ज्या मुख्य शस्त्राचा वापर करतात ते शस्त्र म्हणजे राजकारण,असे म्हटले जाते कि राजकारणात स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो यावरून आपल्याला कळल असेलच कि राजकारण म्हणजे काय तर बऱ्याच लोकांना या विषयाची आवड असेल किंवा नसेलही पण खर तर हे आहे कि सत्ता स्थापित करण्यासाठी राजकारण हे महत्वाचे आहेच.

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही मध्ये फरक असतो पण आताची परिस्थिती अशी आहे कि समाजकारणात राजकारण होत आहे.आणि त्यामुळे लोकांचा विश्वास राजकारणावर बऱ्यापैकी राहिलेला नाही.परंतु तरीही काही झाले तरी शेवटी जेव्हा एखादा या भागातून उमेदवार निवडून देण्याची वेळ येते तेव्हा माळशिरस तालुक्यातील काळमवाडीची ध्येयवेडी जनता दादा शिंगाडे यांचा शब्द ही खाली पडू न देता त्या उमेदवाराला भरगोस मतांचे लीड देतात.दादा शिंगाडे यांच्यासह काळमवाडीतील मोहिते-पाटील प्रेमींना विरोधकांनी अनेक मानसिक त्रास दिला,दबाव आणला,पैशाचे आमिष दाखवले,अक्षरशः जमिनी विकायची वेळ आणली परंतु शिंगाडे यांचा एक ही कार्यकर्ता त्या आमिषाला बळी पडला नाही.त्यामुळे सब्र का फल मीठा होता है या म्हणीप्रमाणे दादा शिंगाडे यांना त्याचे चांगले फळ नक्की मिळणार आहे.परंतु इथून पुढे दादा शिंगाडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्यांच्यासाठी साम,दाम,दंड,भेद यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करणार असल्याचे भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भर सभेत बोलून दाखवले.काळमवाडी येथे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या फंडातुन पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या सिंगल फेज डिपी,जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पाटील यांच्या फंडातुन मंजूर झालेल्या आद्यावत सर्व सोयींनीयुक्त असे ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा नियोजन समीती मधून मंजूर झालेल्या रस्त्याचे उदघाटन व काळमवाडी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या 13 नुतन संचालकांच्या सन्मान समारंभात ते बोलत होते.यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील,कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार,जि.प सदस्य गणेश पाटील यांच्या शुभास्ते वरील विविध विकास कामांचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी पिलीवचे सरपंच नितीन मोहिते,चंद्रकांत जाधव,हरीचंद्र मगर,कुसमोडचे सरपंच तुषार लवटे,नंदकुमार पाटील,सुभाष शिकारे,दत्तात्रय आवताडे, केशवराव पाटील,चंद्रकांत आवताडे,रामचंद्र पवार,शिवामृत दूध संकलन केंद्राचे दादा जाधव,समाधान दुपडे,आबा सुळ,मोहन सुळे, देवीदास शिंदे,शहाजी इंदलकर, क्रुष्णा सुळे, दुर्योधन सोलंकर,उध्दव भोसले, सुमंत डाके, संग्राम आवताडे, विक्रम शिंदे,मोहन शिंदे,रावसाहेब आवताडे,सुनील खुर्द त्याचबरोबर विकास सेवा सोसायटीचे सर्व नूतन संचालक व काळमवाडी,फळवणी,पिलीव,बचेरी या भागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *