आदर्श प्राथमिक विद्यालय निमगाव मध्ये देशभक्त गुरुवर्य कै.धनंजयराव इनामदार यांची जयंती साजरी…..!
निमगाव (म) / प्रतिनिधी
जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव चे संस्थापक गुरुवर्य देशभक्त धनंजयराव इनामदार यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त निमगाव विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज तसेच आदर्श प्राथमिक विद्यालय निमगाव प्रशालेमध्ये प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष महादेवनाना मगर,उपस्थित होते जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीनिवास इनामदार ,संस्थेचे सहसचिव बबनराव जाधव, प्रा सचिन मगर , प्राचार्य रामचंद्र आसबे, सौ सुश्रिया इनामदार,प्रा चिंतामणी मगर,मनोजकुमार बनपट्टे, सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा काटकर यांनी केले प्रास्ताविक प्रा सचिन मगर यांनी केले तसेच विद्यार्थी शिक्षक यांनी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार दीपाली गायकवाड ,शितल पवार यांनी मानले