जाधववस्ती (पिलीव) शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव जाधव यांची निवड

पिलीव / प्रतिनिधी
जि. प. शाळा जाधववस्ती (पिलीव) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ. वैशाली जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारिणीच्या आयोजित पालक सभेच्या अध्यक्षस्थानी अर्जून जाधव होते. यावेळी सदस्य म्हणून ज्योती भैस, दिपाली जाधव, सुजाता पिसे, सरिता पिसे, संतोष नवले, हमीद मुलाणी व जयंत पडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ञ म्हणून सौ. दिपाली फुले तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत धसाडे सर सचिव मुख्याध्यापक सुचित्रा रेड्डी यांची निवड झाली. यावेळी युवराज पाटील,दीपक जाधव, महादेव जाधव, बाबा फुले, प्रमोद जाधव, समाधान जाधव,राणी नवले, सुनिता जाधव, शशीकांत जाधव सह बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *