जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी नगरच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी प्रा.संजय पाटील यांची बिनविरोध निवड..!

पिलीव/प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि प प्रा शाळा लक्ष्मी नगरच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी प्रा संजय पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी रुपाली मदने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. आज लक्ष्मी नगर शाळेतील सर्व पालकांची नुतन व्यवस्था पन समीती निवडीसाठी माजी अध्यक्ष देवीदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नुतन सदस्य पदी विजय मदने, शशिकांत घडयाळे,स्वाती गारुळे,संजय पाटील, पल्लवी मदने, नाथा पवार, दिपाली इंगळे, रुपाली मदने, रणजित पाटील, साधना पवार यांची पालकामधुन तर ग्रामपंचायत सदस्यांमधुन स्वाती मदने, शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुभाष काळे, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांनी मधून अन्वेषा मदने, विद्यार्थी प्रतिनिधी संग्राम गलांडे,शिक्षक प्रतिनिधी सुहास कोल्हे व सुनील डुरे यांच्या निवडी करण्यात आल्या यामधून अध्यक्ष पदी पत्रकार प्रा संजय पाटील व उपाध्यक्ष पदी रुपाली मदने यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.सदर निवडीप्रसंगी धनाजी मदने, लक्ष्मण पवार, सागर गोंजारी, सुर्यकांत वाघमोडे, बाबुराव पवार, नागेश इंगळे,विनायक मदने, मुख्याध्यापक सुहास कोल्हे ,यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर सर्व आजी ,माजी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर नुतन अध्यक्ष प्रा संजय पाटील यांनी हया शाळेसाठी माझ्या वडीलांनी मोफत जागा देऊन हे छोटे शे रोपटे लावले यामुळे या भागातील मुलांची शिक्षणाची सोय झाली. यापुढे मी शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. फोटो – जि प प्रा शाळा लक्ष्मी नगर शाळेच्या अध्यक्ष पदी संजय पाटील तर उपाध्यक्ष पदी रुपाली मदने यांची निवड समवेत नुतन सदस्य ,मुख्याध्यापक कोल्हे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *