राष्ट्रीय समाज पक्ष” व “महाराष्ट्र विकास आघाडी” युतीच्या समाजभूषण पॅनलची पदयात्रा : नगरपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक
नातेपुते /प्रतिनिधी “राष्ट्रीय समाज पक्ष” व “महाराष्ट्र विकास आघाडी” युतीच्या समाजभूषण पॅनलची भव्य पदयात्रा व सभा सोमवार दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात होणार आहे.प्रमुख उपस्थिती रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.मंत्री महादेवजी जानकर,मुख्य महासचिव माजी राज्यमंत्री दर्जा बाळासाहेब दोडतले यांची असणार आहे. तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तनाच्या लढ्याचे साक्षीदार व्हा.
नातेपुते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज पर्यंत प्रलंबित प्रश्नांसाठी एकदा शहरांमध्ये परिवर्तनाचा इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व सुज्ञ नागरिक बंधू-भगिनींनो उद्याच्या पदयात्रेमध्ये व सांगता सभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तनाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्ष व “महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.