कोळेगावच्या विलास करांडे या तरुण शेतकर्याने जेके 811या टोमॅटो पिकाचे घेतले भरघोस उत्पन्न : पिक पहाणी करुन परिसंवादाचे झाले आयोजन…!


पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील एक सामान्य तरुण शेतकरी विलास अंबादास करांडे या शेतकर्याने निव्वळ अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये लावालेल्या जेके 811 या वाणाच्या टोमॅटोच्या माध्यमातून भरघोस असे उत्पन्न मिळवून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

याच अनुशंगाने शिवारातील पिक पाहणी मोहिमेअंतर्गत शेतकरी विलास करांडे यांच्या शेतातील टोमॅटो पिकाची पाहणी व पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेके ॲग्री जेनेटिक्स या कंपनीच्या जेके 811 या वाणाच्या टोमॅटो या भाजीपाला वर्गातील फळपिकाची पाहाणी आली.यावेळी जेके कंपनी ॲग्री जेनेटिक्स हैद्राबाद या कंपनीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/मॅनेजर स्वप्निल अमराळे तसेच डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानेश्वर बोंगाणे तसेच टोमॅटो उत्पादक शेतकरी विलास करांडे,अंबादास करांडे,भक्ती रोपवाटिकेचे मालक सोमनाथ सरगर ,दीपक धनवडे,सचिन अवताडे, साई राम कृषी सेवा केंद्राचे विकास देवकर,जेष्ठ पत्रकार,दामोदर लोखंडे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पीक पाहणी करताना टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्ष टोमॅटोच्या शिवारात माहिती दिली.यावेळी जमिनीची निवड करताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी रोप लागणीपूर्वी पूर्वमशागत करून शेणखत,गांडूळ खत आदि खतांचा वापर करावा व योग्य आशा अंतरावर बेड सोडून दोन ओळीत चार फूट व दोन रोपात तीन फूट अंतर ठेवून जेके 811 या कंपनीच्या तयार केलेल्या रोपांची लागण करण्याचा सल्ला देऊन पाण्याचा पुरेसा व योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी ठिबक चा वापर करावा ठिबक द्वारे द्रवरूप खते व पोषक द्रव्ये सोडावीत झाडाला बुरशीजन्य व आघाडा सारख्या रोगाची लागण होऊ नये म्हणून किटकनाशके,किडीचा बंदोबस्त, प्रादुर्भाव,कमी करण्यासाठी कीटक नाशके फवारणी करावी व रक्षणासाठी तारेचा मंडप योग्य त्या अंतरावर घालण्याचा सल्ला दिला.यावेळी जे के 811या वाणाची लागवड करावी याची माहिती सांगताना सदरच्या वानाचे फळाचे अवरण कठीण असून सात ते आठ दिवस तोडणीनंतर ही चांगलें टिकते आतील गर मजबूत असून लवकर खराब होत नाही.या जातीच्या झाडाला बुडापासून शेंड्यापर्यंत फुल कळी लागून चांगल्या प्रकारे फळाचे पोषण होऊन प्रति झाड दहा ते बारा किलो टोमॅटोचे उत्पन्न मिळू शकते व या रोपाची फळाची क्षमता चांगली असल्याने टोमॅटो फळाला परदेशाची मागणी असून परदेशात पाठविण्यासाठी उपयुक्त असे आहे.म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रात जेके 811 या टोमॅटो वाहनाची लागण करावी यापासून झालेल्या उत्पन्नाची विक्रीची हामी तसेच सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन टोमॅटो पिकाची लागण केल्यास कंपनी किंवा व्यापारी या मालाची विक्री योग्य त्या दराने करू शकतात.यावेळी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बोंगाणे साईराम कृषि केंद्राचे विकास देवकर यांनी तर आभार प्रदर्शन शेतकरी विलास करांडे यांनी केले. यावेळी शेतकरी व पाहणी पथकातील उपस्थितांनी विलास करांडे यांचे कौतुक करुन पुढील शेतकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *