पिलीव येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभाहस्ते 1 कोटी 38 लाख रुपये मंजूर कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न..!

पिलीव/सुजित सातपुते
आज रविवार दिनांक 31 नोव्हेंबर 2021 रोजी माळशिरस तालुक्यातील मौजे पिलीव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभाहस्ते 1 कोटी 38 लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन व उदघाट्न करण्यात आले.

यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार राम सातपुते,भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील,कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार,पंचायत समिती सभापती शोभाताई साठे,मा.उप सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,उपसभापती प्रतापराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील,सुनंदा फुले,राहुल बापू वाघमोडे,पंचायत समिती सदस्य ताई महाडिक,पिलीव सरपंच नितीन मोहिते, उपसरपंच संजय आर्वे,शिवामृत दुध संघांचे संचालक दादासाहेब शिंगाडे,दत्तात्रय आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.प्रसंगी खालील विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.3054 या योजनेतून कारंडे वस्ती,लक्ष्मी रोड,जरग वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,आमदार फंडातून सठवाई रोड डांबरीकरण करणे,दलितवस्ती सुधार योजनेतुन भीमनगर समाज मंदिर बांधणे, लोखंडे वस्ती रस्ता काँक्रीट करणे,सातपुते वस्ती करडे वस्ती पाण्याची टाकी बांधणे, भूमीगत गटार बांधणे, नागरी सुविधा योजनेतून पिलीव करांडे वस्ती डांबरीकरण,सुनील खुर्द वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,जिल्हा परिषद शिक्षण विभाग मधून मुलींची शाळा,जगरवस्ती शाळा नवीन खोली बांधणे, जगरवस्ती जि.प. शाळा ऑल कंपाउड बांधकाम करणे,पिलीव शाळा पेव्हर ब्लॉक बसवणे, 15 वा वित्त आयोग योजनेतून महादेव मंदिर ऑल कंपाउड बांधकाम करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा पिलीव ग्रा.पं येथे सत्कार करण्यात आला. तसेच सुनिल शिवाजी सातपुते यांनी स्वतः शक्कल लढवून बनवलेल्या ऊस खोडवा फोडणी यंत्राचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मळोलीचे चंद्रकांत जाधव, भाजपा यूवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल मदने,चेअरमन अविनाश जेऊरकर,समशेरसिंग राजपूत,सरपंच संघटना अध्यक्ष सचिन पाटील,पिलीव ग्रा.पं सदस्य जिवन गोरे,झंजेवस्तीचे सरपंच राहुल जावळे,कुसमोडचे सरपंच तुषार लवटे,महेश काळे,भैय्या जामदार,शंकर काळे,बाळासाहेब फुले, ब्रह्म्देव लोखंडे, सुनील खुर्द,महादेव लोखंडे,प्रवीण वाघमारे, युवराज सातपुते,आप्पा लोखंडे, तानाजी लोखंडे,सुषमा जामदार, बांधकाम विभागाचे मुलाणी रावसाहेब, ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर,पत्रकार बंधू,ग्रामपंचायत सदस्य व पिलीव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *