डॉ.कुमार लोंढे यांची अपघातग्रस्त व्यक्तींना 52500 रु.एवढी मदत : सदैव सामाजिक बांधिलकी जपणार्या डॉ.लोंढे दांम्पत्याचे तालुक्यातून कौतुक..!

  पिलीव/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गारवाड- चांदापुरी भागातील डॉ.कुमार लोंढे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.पंचशीला लोंढे हे दोघे दाम्पत्य सामाजिक बांधिलकी म्हणून दुष्काळग्रस्त व्यक्तींना मोफत आरोग्य सेवा,महापरिनिर्वाण दिन मुंबई व पंढरपूर वारी निमित्त मोफत आरोग्य वैद्यकीय सेवा,रक्तदान शिबिरे,मुले दत्तक योजना,ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी पहिली ते बारावी शाळा,कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना आरोग्य,जीवनावश्यक ,शालेय साहित्य मदत,आत्महत्याग्रस्त मुलांना दत्तक घेणे, ऊसतोड मजुरांना त्यांचा पालावर मोफत वैद्यकीय सेवा,दुष्काग्रस्त मुलींनाल लग्नासाठी आर्थिक सहाय्य डॉ.आंबेडकर अभ्यासिका अशा सामाजिक उपक्रमात सोशल संस्था व व्यक्तिगत पातळीवर ते अनोखे पद्धतीने कार्य करत असतात.
प्रत्येक वर्षी दीपावली निमित्त ते अनोखे उपक्रम करत असतात ऊसतोड कामगार सोबत दिवाळी तसेच पाठीमागील वर्षी पंढरपूर मधील एडसग्रस्त पालवी संस्थेत दिवाळी साजरा केली.या दिपावली मध्ये त्यांनी कुटुंबाची दिवाळी रद्द करून अपघातग्रस्त व्यक्तींना वेगवेगळ्या पातळीवर मदत केली आहे. ऐन दिवाळीत या अपघातग्रस्त कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे त्यांनी काम केले आहे.
अकलूज येथील बारा वर्षाच्या मुलीच्या अपघातात पायाचा अक्षरशः चुराडा झाला तिचे वडील मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करतात तर आई गृहिणी आहे.या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना अकलूज येथे सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदत केली.पुणे येथे अपघातात ऍडमिट असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास नुसता आधार न देता रोख स्वरुपात मदत केली. म्हसवड येथे सोळा वर्षाच्या मुलाला तर सोलापूर येथील ब्रेन ऑपरेशनसाठी ही पैस्याची मदत करून यांचे अश्रू पुसण्याचे कार्य केले.
स्वतः दिवाळी न करता,स्वतःच्या कुटुंबाची आशा अपेक्षा बाजूला ठेवून समाजासाठी झटणारे लोकांचे अश्रू पुसणारे दाम्पत्य म्हणजे आजच्या युगातील समाजसेवेच व्रत बाळगणारे थोर समाजसुधारक आहेत.त्यांच्या कार्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी बोलताना डॉ. कुमार लोंढे म्हणाले समाजातील शेवटचा व्यक्तीचे दुःख व अश्रू पुसण्यासाठी आम्ही आमचे आयुष्य सार्थकी लावणार आहोत! फुले,शाहू,आंबेडकर यांचा विचार आणि समाजातील सकारात्मक लोकांच्या पाठिंब्यावर आयुष्यभर कार्यरत राहण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.
ही सर्व मदत डॉ.लोंढे कुटुंबियांची व्यक्तिगत स्वरूपाची आहे. समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था यांनी ही पुढे येऊन दुःखी लोकांचे अश्रू पुसण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *