काळमवाडी विकास संस्थेच्या सभासदांना 15 % प्रमाणे लाभांशाचे वाटप : बँक इन्स्पेक्टर शेजाळ यांच्याकडून संंस्थेचे कौतुक
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील काळमवाडी येथील काळमवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सभासदांना 2021 च्या नव्या प्रमाणे पंधरा टक्के लाभांशाचे वाटप डी.सी.सी बँकेचे इन्स्पेक्टर भारत शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना काळमवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची बँक इन्स्पेक्टर भारत शेजाळ यांनी बॅंक कर्ज वसुली शंभर टक्के झाली असल्याचे सांगितले.कामकाजातही नियमित असलेने कायम ब वर्गात संस्था राहिलेली ही आहे.आर्थिक उलाढालीवर चांगल्या प्रकारे नफा झाल्याने डीसीसी बँकेच्या आदेशाप्रमाणे सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येत आहे सदरची संस्था ही या भागातील एकमेव नेहमीच नियमाप्रमाणे व सभासदांचे हित जोपासणारी संस्था असलेलेल्या यासंस्थेस व सभासदास बँकेचे चांगले सहकार्य राहील.मा.खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती केली आहे.या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची वार्षिक 2020 – 2021 ची उलाढाल 4 कोटी 75 लाख एवढी झाली आसून 31/3/2021 अखेरच्या झालेल्या रुपये 2139000 नफ्यावर व ठेवीवर खात्याच्या नियमानुसार 15 टक्केप्रमाणे 1025 सभासदांना वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती चेअरमन महादेव आवताडे यांनि दिली.यावेळी संस्थेच्या सचिवा श्रीमती गीता लोखंडे,लेखनिक शैलेश आवताडे,कर्मचारी गजानन गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.यावेळी बँक इन्स्पेक्टर भारत शेजाळ,चेअरमन महादेव आवताडे,व्हाईस चेअरमन महादेव भोसले,माजी सरपंच दादासाहेब शिंगाडे,भगवान अवताडे,सुदाम शिंदे,हनुमंत भोसले,संजय शिंगाडे,रावसाहेब इंदलकर,संतोष शिंदे,शब्बेकदिर पठाण,ॲड नंदकुमार अवताडे, संचालक,सभासद आदि मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन शब्बेकदिर पठाण यांनी तर आभारप्रदर्शन चेअरमन महादेव आवताडे यांनी व्यक्त केले.