सदगुरुमध्ये चालू हंगामातील पहिल्या अकरा पोत्यांचे पूजन..!

पिलीव/प्रतिनिधी

गेली दहा वर्षापासून सांगली,सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदायिनी ठरलेल्या तसेच श्री श्री रविशंकर जी गुरुजी यांच्या आशीर्वादाने व पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच चेअरमन मा एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली यशस्वीपणे वाटचाल करत असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमी. श्री श्री नगर राजेवाडी येथील चालू हंगामातील प्रथम अकरा पोत्यांच्या पूजनाचा कार्यक्रम एच आर व ॲडमिन मॅनेजर समीर सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता.प्रथम व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, उद्योजक सचिनदादा वावरे व जनरल मॅनेजर मोहनलाल पाल यांनी सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व खाते प्रमुख व कामगारांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी खातेप्रमुख व कामगारांना संबोधित करताना आपण घेतलेले ऊस गाळपाचे टार्गेट पूर्ण करून दाखवूयात असे आवाहन केले. शेवटी डीजीएम शहाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *