झिंजेवस्ती येथील माधव निवृत्ती मदने या सामान्य शेतकर्याचा मुलगा झाला क्लास वन अधिकारी : विवीध स्तरातून कौतुक व अभिनंदन..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव (झिंजेवस्ती) येथील सामान्य शेतकरी माधव मदने यांचे सुपुत्र डॉ.प्रताप माधव मदने यांची लोकसेवा आयोगामार्फत पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-1 पदी निवड झाली आहे.प्रताप मदने यांचे वडील माधव निवृत्ती मदने शेती व्यवसाय करतात प्रताप यांचे माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज भाळवणी येथे झाले.शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्याल येथून बी.व्ही.एस.सी पदवी घेतली तर पदयूत्तर पदवी भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान, इज्जतनगर, बरेली
येथून घेतली आहे.सध्या माझी पी.एच.डी चालू असून स्पर्धा परिक्षे चा अभ्यास चालू असल्याचे डॉ.प्रताप मदने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सदर निवडी बद्दल राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर,पिलीव परिसरातील जेष्ट नेते श्यामतात्या मदने,सिध्दीविनायक मित्र मंडळ,विवीध संघटनांचे पदाधिकारी व मित्र वर्ग यांनी डॉ.प्रताप मदने यांचा यथोचित सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पिलीवसह परिसरातून डॉ.मदने यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत असून विवीध स्तरातून त्यांचे कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *