पिलीव परिसरातील रोडरोमिओंचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा कायदा हतात घेतला जाईल – राहूल मदने,जिल्हाउपाध्यक्ष
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर विद्याल व रमेश खलिपे ज्युनिअर कॉलेज आणि जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये झिंजेवस्ती,कुसमोड,सुळेवाडी,शिंगोर्णी,बचेरी,पठाणवस्ती,चांदापुरी,काळमवाडी,साळमुखवाडी यांसह इतर वाड्या-वस्त्यावरील विद्यार्थी शिक्षणासाठी रोज पिलीवला येत असतात.दोन विद्यालये व एक महाविद्यालय व खाजगी क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांची रोज रहदारी असते परंतु याच रहदारीचा फायदा घेत शाळेत ये-जा करणार्या मुलींना काही टपोरी मुले त्रास देत असल्याने भाजपा यूवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष राहूल मदने यांनी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना लेखी निवेदन सादर केले आहे.पिलीव गावात रोडरोमिओंचा सुळसुळाट उठला असल्याने कर्मवीर विद्यालय अँड रमेश खलिपे ज्युनिअर कॉलेज पिलीव व जवाहरलाल शेतकी विद्यालय पिलीव या शाळेतील व खाजगी क्लासेसच्या मुलींना शाळा सुटताना,भरताना रोडरोमिओंचा अधिक त्रास होत आहे.

दुचाकींचा कर्णकर्कश आवाज,मुलींच्या जवळ जाऊन हॉर्न वाजवणे,रस्त्यातून मुली जाताना हेलपाटे मारणे,मुलींच्या सायकला गाडी खेटून घेणे अशा प्रकारचा मुलींना त्रास होत आहे.काही रोडरोमिओ तर मुलगी घरातून बाहेर पडल्यापासून ते कॉलेज पर्यंत आणि कॉलेज सुटल्यावर कॉलेज पासून ते घरापर्यंत मागे जात असल्याचे चित्र पहावयास मिळत असून सर्व मुली या खेड्यापाड्यातून येत असल्यामुळे या गावात बऱ्यापैकी पालक अशिक्षित आहेत.त्यामुळे घरी सांगावे तर शाळा बंद होण्याची भीती किंवा मोठे भांडण होण्याची मुलींना भीती वाटते परंतु या रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पिलीव परिसरात दामिनी पथकाची अवश्यकता आहे.खाजगी क्लास संपल्यानंतरही तथाकथित रोडरोमिओं क्लासच्या आसपास मोटारसायकलवरून मुलींकडे बघून विचित्र हावभाव करणे किंवा इशारा करणे इत्यादी प्रकार घडत असून सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भाजप युवा मोर्चा कडून कायदा हातात घेतला जाईल व रोडरोमिओंचा बंदोबस्त केला जाईल असे जिल्हाउपाध्यक्ष राहूल मदने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.