ऊस बिलातून कृषी पंपाचे वीज बिल वसूल करु नका अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटतील – राहूल मदने
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मदने यांनी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना ऊस बिलातून कृषी पंपाच्या वीज बिलाची वसूली करु नये अशा अशेयाचे आज ईमेलद्वारे निवेदन सादर केले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की कोव्हीडचा काळ,दुष्काळी परिस्थिती व अतिवृष्टी यामुळे अखंड महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पीक घेतले आहे.तो ऊस कारखान्यांमध्ये गाळपासाठी जाणार असून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल कारखान्यांना उसाच्या बिलातून कपात करण्यासाठी संबंधित सुत्रांची हलचाल सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.परंतु शेतकरी आणि महावितरण कंपनी यांच्याशी सदरचा व्यवहार संबंधित असल्याने व बर्याच दिवसाची थकबाकी असल्याने कारखाने संपूर्ण बिल कपात करू शकतात.त्यामुळे शेतकरी त्याचे बँक कर्ज,सोसायट्या व इतर प्रासंगिक खाजगी कर्ज फेडू शकत नाही.जेव्हा शेतकऱ्यांना FRP मिळत नाही तेव्हा काय महावितरण शेतकऱ्यांना पैसे देते का ? त्यांना आशा वेळी पैसे द्यावेत आणि मंगच आमच्या उसाच्या बिलाला हात लावा.अशा या आडमुट्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत येऊ शकतो म्हणून शेतकरी आणि महावितरण कंपनी यांचेवर हा विषय सोडावा व कारखान्याच्या ऊस बिलातून येणार्या कृषीपंपाचे वीज बिल वसूल करू नये.वीज बिल वसुली ही शेतकऱ्याचा व महावितरणचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात कारखान्यांनी हस्तक्षेप करू नये.सरकारने या मध्ये हस्तक्षेप करावा अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्या रोषातून महाराष्ट्राभर याचे तीव्र पडसाद उमटतील असेही सदर निवेदनात म्हटले आहे.