पोनि दिपरतन गायकवाड व सपोनि शशिकांत शेळके यांची धाडसी कामगिरी : आंतरजिल्यातील सराईत गून्हेगार गावठी पिस्तुलसह केले जेरबंद,आठ लाखाचा मुद्दे माल केला हस्तगत..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावामध्ये एक चॉकलेटी रंगाची बोलेरो गाडी व त्यामध्ये तिन इसम संशयित रित्या फिरत आहेत अशी गोपनीय माहीती माळशिरस पोलीसांना मिळाली यानंतर पोलिसांनी तपासाची अतिशय वेगवान चक्रे फिरवली.माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सपोनि शशिकांत शेळके,सपोनि घोळकर यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शिंगोर्णी येथील नरळेवस्ती येथील उसाच्या शेताजवळ सापळा लावला असता तेथे बोलेरो गाडी आढळून आली.

यामधील शिंगोर्णी येथील सराईत गुन्हेगार ऊसात पळून गेला.तर दुसर्या दोन आरोपींना पकडण्यात यश आले यातील एक आरोपी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील तर दुसरा आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील असून त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल ,एक चाकु व वापरत असलेली चॉकलेटी कलरची बोलेरो जिप क्र.एम एच १४ ऐ झेड ९७९८ ही गाडी आढळून आली. तसेच गाडीमध्ये दोन लहान मुलांच्या कपडयांच्या गोण्या आढळून आल्या यामध्ये लहान मुलांची पँट, शर्ट आढळून आले.तसेच एक लोखंडी कटावणी व कोयता आढळून आला.सदर इसमांवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुरनं ५७५/२०२१ शस्त्र अधिनीयम ३’२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात वापरलेल्या गाडीविषयी अधिक चौकशी केली असता तिचा नंबर बनावट असल्याचे आढळून आले यावरून त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता सदरची गाडी एम एच १४ ऐ झेड ९७९७ ही धुळे येथून चोरून आणल्याचे त्यांनी सांगितले .त्यांच्या वर धुळे जिल्ह्यातील देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गाडी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या वर गुरनं २७१/२०२१ भादविक ३७९ प्रमाणे त्याठिकाणी त्यांच्या वर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे.तसेच गाडीतील आढळून आलेल्या कपडयांच्या गोणीबाबत चौकशी केली असता दिघंची- आटपाडी रोडवरील जयभवानी कलेक्शन हे दुकान फोडून कपडे व रोख रक्कम चोरली असल्याचे उघड झाले आहे.सदर दोन्ही आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून एक बुलेट मोटारसायकल चोरली आहे त्याठिकाणी निफाड पोलीस ठाण्यात त्यांच्या वर गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.सदरचे आरोपी अट्टल दरोडेखोर असुन त्यांच्या वर धुळे,नाशिक, सांगली,अहमदनगर,जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.तसेच यातील एक आरोपी तिन वर्षे शिक्षा भोगुन आला आहे.हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या वर धुळे,नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात अजून गुन्हे उघडकीस येणयाची शक्यता आहे.हे गुन्हेगार इतर जिल्ह्यात जाऊन घरफोडी, जबरी चोरी करण्यात सराईत आहेत.सदर आरोपीची गोपनीय माहिती काढून त्यांना जेरबंद करण्यासाठी सायबर किंग पोकाँ दत्ता खरात यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड,सपोनि शशिकांत शेळके,सपोनि नितीन घोळकर,पो काँ तुळशीराम गायकवाड,पो हे काँ पंडीत मिसाळ,पो ना सुशिल साळुंखे, पो ना वैभव लेंडवे,पो ना राहुल वाघ, पो काँ सतिश धुमाळ,पो काँ अन्वर आतार ,होमगार्ड संतोष शिंदे यांनी केली असून पुढील तपास सपोनि शशिकांत शेळके हे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *