पिलीव येथील दोस्ती ग्रुपच्यावतीने युवा नेते एजाज पठाण यांचा वाढदिवस उत्सहात साजरा..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती गावचे माजी उपसरपंच तसेच अर्जुनसिंह मोहीते-पाटील यांचे खंदे समर्थक युवा नेते मा.श्री एजाज फैजखान पठाण यांचा पिलीव येथील दोस्ती ग्रुपच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने परंतु उत्सहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

आज दिवसभरात त्यांचा माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी विविध संघटनांच्या व पदाधिकार्यांच्यावतीने आगदी साध्यापध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.पठाणवस्ती गावच्या वैभवात भर टाकण्यासाठी व गावासाठी रस्ते,गटारी,हायमास्ट,पाईपलाईन,गरजूंसाठी घरकुले यांसह अशी अनेक विवीध विकास कामे मंजूर करुन घेण्यासाठी एजाज पठाण यांची सुरु असलेली धडपड पाहून त्यांचे परिसरात नाव लौकिक झाले आहे.त्यामुळे पिलीव,पठाणवस्ती,चांदापुरी यांसह परिसरामध्ये एजाज पठाण यांच्या नावाची क्रेझ बनली असून पठाण यांना मानणारी तरुण वर्गाची एक मोठी व मजबूत अशी फळी निर्माण झाली आहे.गावातील गरिब व गरजू लोकांसाठी अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे,कोरोनासारख्या महामारीत अनेक संक्रमित लोकांना कोव्हीड सेंटरला ॲडमिट करणे,गरिब परंतु होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे यांसह गावातील लोकांच्या इतर समस्यांचे निवारण करणे हिच एजाज पठाण यांची अदा आज तरुण वर्गाची आवड बनली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे भविष्यात राजकीय क्षेत्रात एजाज पठाण हे नक्कीच मोठी बाजी मारतील असे म्हणले तर वावगे ठरणार नाही..!