भाजपा नेते धैर्यशील मोहीते-पाटील यांच्याहस्ते पिलीव प्रा.आ केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपण : जि.प शाळेची केली पहाणी..!

पिलीव/प्रतिनिधी
भारत देशाचे पंतप्रधान‌‍ नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर भाजपा मार्फत राष्ट्रीय सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून माळशिरस तालुका भाजपा मार्फतही तालुकाभर रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्याच अणुशंगाने माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.या फळे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील यांनी सध्या लस घेण्याची गती मंदावली असून पिलीव परिसरातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची विनंती केली. तर यावेळी मार्गदर्शन करताना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपाच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील नागरिकांना लसीकरण
करून घेण्यासाठी प्रबोधन करून प्रवृत्त करावे तसेच पत्रकारांनीही गावोगावी प्रबोधन करून नागरिकांना प्रवृत्त करावे व जे गाव 100% लसीकरण करुन
घेईल त्या गावांना कोरोना योध्दा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात यावे असे सुचित केले.यावेळी पिलीव पत्रकार संघातील सर्व सदस्यांच्यावतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते यांनी पत्रकारांमार्फत शंभर टक्के लसीकरण करण्यास प्रोत्साहन देऊन लसीकरणाची मोहीम राबविली जाईल याची खात्री दिली.यावेळी राष्ट्रीय आरोग्य खात्यामार्फत मिळालेल्या क्लाऊड या शरीर तपासणी मशीनचे उद्घाटन धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच यावेळी उपस्थित व दाखल रुग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या ताई महाडीक,पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते-माळी,उपसरपंच संजय आर्वे,तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,शिवामृतचे संचालक दादासाहेब शिंगाडे,चेअरमन अविनाश जेऊरकर,भाजपाचे सोलापूर जिल्हा युवक मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल मदने,रणधीरसिंग जामदार,समशेरसिंग राजपुत,वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष माने-देशमुख,डॉ.विलास जाधव,पर्यवेक्षक राजू शेख यांसह विवीध गावचे सरपंच,उपसरपंच,पत्रकार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी तर आभारप्रदर्शन सरपंच नितीन मोहिते-माळी सदर कार्यक्रमाच्या समाप्ती नंतर पिलीव येथील रंग-रंगोटी केलेल्या डीजीटल जि.प शाळेला मोहीते-पाटील यांनी भेट देवून सदर कामास योगदान देणार्या समशेरसिंग राजपुत या निष्ठावंत कार्यकर्त्याचा शाल,श्रीफळ देवून सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *