सोमनाथ ढवळे या कृषी दुताचे बचेरी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयी लाभले मोलाचे मार्गदर्शन..!
पिलीव/प्रतिनिधी
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडी ता.वैभववाडी,जि.सिंधुदुर्ग येथील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत सोमनाथ बाळु ढवळे या विद्यार्थ्याने काल बचेरी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा घेतली व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल माहिती सांगितली.यावेळी आधुनिक शेतीत होत असलेला रासायनिक खताचा अतिरिक्त वापर याचे तोटे शेतकऱ्यांना समजून सांगितले व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन केले.कमी दिवसात भरपूर प्रमाणात उत्पन्न काढण्याच्या लोभासाठी शेतकरी शेतामध्ये अतिरिक्त केमिकल रसायनांचा वापर करतो.यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे. अतिरिक्त रासायनिक खतामुळे अनेक रोगांचे प्रमाण वाढले असून मानवी जिवितास धोका होत आहे ही बाब गंभीर असल्याचे सोमनाथ ढवळे याने शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. उत्पन्न कमी निघाले तरी चालेल परंतु सेंद्रिय शेती मुळे आरोग्यास कोणताही धोका होत नाही व जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहते.अतिरिक्त रासायनिक खतामुळे जमीनी नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.बचेरी येथील युवक सोमनाथ ढवळे हा विद्यार्थी सांगुळवाडी येथील कृषी महाविद्यालयात अध्यापन करत असून त्यांने आपल्या ज्ञानाचा प्रसार बचेरी येथे एक दिवशीय कार्यशाळा घेऊन केला.त्याच बरोबर पिकाची लागवड करताना त्या जमिनीतील मातीचे परीक्षण करण्यात यावे याबद्दल ही मार्गदर्शन केले.यावेळी मला प्राचार्य गायकवाड सर व प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे ढवळे याने सांगितले.सदर कार्यक्रमासाठी माजी सरपंच केराप्पा माने,ग्रामपंचायत सदस्य दिलीप माने,शेतकरी पितांबर शिकारे,काशिनाथ काटे,भारत काटे,निवृत्ती ढवळे,नामदेव गोरड यांसह इतर शेतकरी उपस्थित होते.