राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी कुमार लोखंडे यांची निवड : इतर विविध पदांच्याही निवडी जाहीर..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाच्या निवडी जाहिर करण्यात आल्या असून सामाजिक न्याय विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी पिलीव येथील कुमार शंकर लोखंडे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी नितीन हरिभाऊ कपने,ओबीसी विभागाच्या तालुका संघटकपदी लहू पाटील यांची निवड करण्यात आली असून अनेक इतर कार्यकर्यत्यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदावर निवडी करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांच्या उपस्थितीत वेळापुर येथे सदरच्या निवडी करण्यात आल्या असून‌ पिलीव ब्लाँकच्या अध्यक्षपदी पिलीव ग्रामपंचायत सदस्य जीवन गुरव यांची तर पिलीव येथील कुमारसिंग भैस ‌पिलीव यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर विजय पिसे( राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुका संघटक),कुसमोड येथील शुभम धायगुडे ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका सहकोषाध्यक्ष ),काळमवाडी येथील भुजंगराव शिंगाडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका सरचिटणीस पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शिंगोर्णीचे औदूंबर काळेल यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर सूनील नामदेव‌ खंडागळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रसीध्दीप्रमूखपदी निवडी करण्यात आल्या आहेत.सदरच्या निवडीतील नूतन पदाधिकार्यांचा विवीध स्तरातून सत्कार होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *