पिलीव परिसरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिला वर्गाने साध्या पद्धतीने परंतु नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला श्री महालक्ष्मी देवीचा घरगुती उत्सव..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे व परिसरात श्री.गणेशोत्सवादरम्यान श्री महालक्ष्मी देवी घरगुती उत्सव कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून अतिशय साध्या पद्धतीने परंतु महिलांना एकत्रित करून सौभाग्याचे प्रतीक असलेल्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन घराघरांमध्ये टाकाऊ वस्तु पासून आकर्षक असे शेती विषयक त्याचप्रमाणे “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” चा नारा देणारे तर “गो कोरोणा” “छोटे कुटुंब सुखी कुटुंब”, “नैसर्गिक शेती हाच पर्याय”, शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”,” अवर्षणावरील उपाय वनीकरण” या विषयावरती घोषणा फलक व चर्चासत्र अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून

शिंगोर्णी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ छाया अनिल जाधव तसेच श्री.साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन गडपाटी (आळणी) ता. जि.उस्मानाबाद ची बीएड ची विद्यार्थिनी सौ.मेघाराणी प्रकाश जाधव-देवकर ,सौ सुंदर शंकर जाधव ,सौ.प्रमिला आप्पा जाधव यांनी तर भाळवणी येथे सौ.मयुरी विनायक जाधव-देवकर (श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन गडपाटी )आणि सौ दिपाली गजानन जाधव तर भांबुर्डी येथे सौ.राजश्री वसंत देवकर, सौ दिपाली विशाल देवकर, सौ सोनाली रणजीत देवकर, ॲड.मोहिनी रघुनाथ देवकर (शिवाजी मराठा लॉ कॉलेज पुणे), कु.आर्या अमोल खंडागळे व पिलीव येथील श्रीराम गल्लीत ग्राम शिक्षण समिती उपाध्यक्षा सौ.स्मिता विजयकुमार देवकर, सौ.शोभा रघुनाथ देवकर,सौ. पल्लवी विकास देवकर, सौ.जयश्री रामचंद्र देवकर, सौ.मंगल दत्तात्रय देवकर, कु.स्वरांजली विजयकुमार देवकर या महिलांनी श्री महालक्ष्मी देवी उत्सवातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
