पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची धडाकेबाज कामगिरी : वाळु माफियांचे धाबे दणानले,लाखोंचा मुद्देमाल जप्त
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील गावच्या हद्दीत सरकारी ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी दि.13/9/2021 रोजी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने छापा मारून सदर ठिकाणी एकूण चार ट्रॅक्टर,ट्रॉल्या(वाळू भरलेली)असा एकूण 26 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सदर ठिकाणी अवैध वाळूचे उत्खनन करीत असलेले आरोपी 1)सुखदेव नवनाथ कचरे रा.कचरेवाडी, 2)शिवाजी भानुदास शिंदे रा. तिरवंडी, 3)काशिनाथ रामा वाघमोडे रा. तिरवंडी, 4)सदाशिव दत्तू वाघमोडे रा. तिरवंडी, 5)विठ्ठल संजय जाधव रा. तिरवंडी, 6)विकास नवनाथ कचरे रा. कचरेवाडी यांना अटक केली आहे.सदर आरोपींच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यांना दि. 14/9/2021 रोजी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने वरील सहा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.उर्वरित दोन आरोपी फरार असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करीत आहेत.या कारवाईमुळे पोनि दिपरतन गायकवाड व त्यांच्या टिमचे परिसरातून कौतुक होत आहे.मात्र वाळु माफीयांचे चांगलेच धाबे दणानले असतील यात तीळ मात्र शंका नाही असे परिसरातील सामान्य जनतेतून चर्चिले जात आहे.