मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!
पिलीव/सुजित सातपुते
ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यास कार्यक्रमाअंतर्गत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विध्यार्थी कृषिदूत शुभम गोपालसिंग भैस यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.शेती अभ्यासक्रमात ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो.यामध्ये विध्यार्थी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.त्याला अनुसरून पिलीव येथे दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील कृषिदूत शुभम भैस यांनी फळ पिकावरील भुरी रोग व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत व त्याचा फायदा याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती नवीन आधुनिक तंत्रज्ञान,शेतीउद्योग व्यवसाय,रासायनिक खतांचा योग्य वापर व इतर शेती विषयक बाबींविषयी मार्गदर्शन केले.दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विशेष शिक्षक प्रा.डॉ.एस.एम.शिंदे,प्रा.व्ही.व्ही.माने,प्रा.डॉ. के.गुटूकडे,प्रा.कुंभार आणि इतर प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले. तसेच या कृषी कार्यानुभव उपक्रमात शेतकरी राजू स्वामी,ऋषी भैस,दत्ता राजपूत,अमोल चोबे,विनायक जाधव,रोहित यादव,पप्पू चोबे यांसह पिलीव परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.