सदगुरु श्री श्री साखर कारखान्यामध्ये श्रावण मासानिमित्त रुद्र पूजा संपन्न..!

पिलीव/रघूनाथ देवकर

सदगुरु श्री श्री सा का लि श्री श्रीनगर (राजेवाडी) ता. आटपाडी जि सांगली येथे श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जात असून शास्त्रोक्त पद्धतीने या कारखान्यांमध्ये अनेक कार्यक्रम व विधी पार पाडले जातात. त्याच धर्तीवर परंतु सर्व संचालक मंडळाच्या सौजन्याने सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने कारखाना स्थळावर रुद्र पूजेचे आयोजन एच आर व एडमीन मॅनेजर समीर सय्यद यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून केले गेले. प्रथमतः चेअरमन एन.शेषागिरीराव यांचे हस्ते सद्गुरु श्री श्री सद्गुरू रविशंकर जी यांचे फोटोचे पूजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली.गुरुमुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापूर( मठपती) व शिवराज शर्मा महाराज व त्यांचे सहकार्यांनी मंत्र पठण, सत्संग आरती द्वारे चेअरमन एन. शेषागिरी राव व जनरल मॅनेजर मोहन लाल पाल, डीजीएम शहाजी पाटील , एच आर व ऍडमिन मॅनेजर समीरभाई सय्यद, केन मॅनेजर के एच पताळे सुनील सावंत, शेती अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर राम मोहन (प्रॉडक्शन मॅनेजर), चीफ इंजिनियर महांतेश लोकुनवार,सिव्हिल इंजिनिअर अवधूत जमदाडे व उपस्थित खातेप्रमुख कामगारांच्या समवेत रुद्र पूजेचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.आभार व प्रास्ताविक केन मॅनेजर सुनील सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *