अनिसच्या नूतन तालुकाध्यक्षपदी राजेंद्र गिरमे यांची निवड..!
कार्याध्यक्षपदी रघुनाथ वाघमारे ; उपाध्यक्षपदी गिरीश ढोक यांची निवड
माळीनगर(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती माळशिरस तालुका शाखा अध्यक्षपदी राजेंद्र गोपाळराव गिरमे यांची फेरनिवड करण्यात आली.मंगळवार दि.३ ऑगस्ट रोजी येथील मॉडेल विविधांगी प्रशालेत माळीनगर शाखेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत तालुका अध्यक्ष पदावर राजेंद्र गिरमे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.नूतन कार्यध्यक्षपदी रघुनाथ वाघमारे यांची तर प्रधान सचिवपदी भीमराव चंदनशिवे यांची निवड करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य गिरीश ढोक हे उपाध्यक्ष झाले आहेत.माळशिरस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९९५
साली माळीनगर येथे ‘अंनिस: चळवळीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. गेल्या २६ वर्षात या शाखेने अंधश्रध्दा निर्मूलन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो प्राथमिक व माध्यमिक विभागतील शिक्षकांना ‘वैज्ञानिक जाणिवा’ शिबिरे घेवून प्रशिक्षित केले आहे.अघोरी प्रथा,बुवाबाजी व चमत्कारांचा पर्दाफाश,जटनिर्मूलन, देवदासी प्रथा,समाजप्रबोधन,विवेक वाहिनी अशा अनेक क्षेत्रात या शाखेने उल्लेखनीय कार्य केले आहे. सन २०२१-२२ साठी नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-नूतन तालुकाध्यक्ष राजेंद्र गिरमे, गिरीश ढोक(उपाध्यक्ष), वाघमारे(कार्याध्यक्ष),भीमराव चंदनशिवे(प्रधान सचिव) ,महादेव पाटील(बुवाबाजी संघर्ष),शैलेश मान(वार्तापत्र व प्रकाशन विभाग),अमोल भालके,जगन्नाथ कोळी(वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प),सविता पांढरे,माया शिंदे(महिला विभाग),सत्यवान साळुंखे व रणजित लोहार(विविध उपक्रम),राजेश कांबळे व केतन नकाते(जाती निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड),अभिजित हेगडे,महेश शिंदे(मानसिक आरोग्य),राम हरी वायचळ व कमलाकर फरताडे(युवा व विवेक वाहिनी),रामदास जाधव व माधव ढगे(सोशल मिडिया विभाग),सुनील शिंदे,नामदेव जोशी,संतोष कोळी,सचिन नाळे(प्रशिक्षण),कल्याण कापरे,सचिन आतकर(कायदा विभाग),बाळासाहेब सोनवणे,संजय पवार(सांस्कृतिक विभाग),राजीव देवकर,प्रकाश चवरे,रितेश पांढरे,वसंत पिंगळे,प्रदीप बोरावके(तालुका सल्लागार समिती).राज्य कार्यवाह डॉ.मुक्ता नरेंद्र दाभोळकर,जिल्हाध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे,जिल्हा कार्याध्यक्ष विनायक माळी आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.