पिलीव,भाळवणी परिसरात वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी..!
पिलीव / रघुनाथ देवकर
पिलीव,भाळवणी भागामध्ये वटपौर्णीमेचे औचित्य साधुन भाळवणी
(नायकाची) येथील जाधव परिवारातील महिलांनी एकत्रीत येऊन वृक्षवल्ली आम्हासोयीरेचा नारा देत हळदी कुंकुचा कार्यक्रम करत ज्या सतीसावित्रीने वडाची पूजा करून हाच पती साताजन्मी मिळो असे आपण ऐकतो त्या अनुषंगाने वडाचे झाडांचे सर्व महिलांनी सामुहिक पुजन केले त्यावेळी श्री साई जनविकास प्रतिष्ठान काॅलेज आॅफ एज्युकेशन उस्मानाबाद अध्यापक महाविद्यालयातील सौ.मयुरी विनायक जाधव. यांनी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची इत्यंभुत माहीती देऊन आपल्या बोलीभाषेतुन प्रत्येकीने आपली आठवण म्हणुन ,आपल्या वारसांची सावली म्हणुन वृक्षारोपण केले पाहीजेत असे सांगुन सर्व उपस्थितांना बोलताना आॅक्सिजनचे महत्त्व किती व काय आहे एवढेच काय आपल्या पुर्वजांनीसुध्दा पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आप आपल्या दारापुढे लिंब वड,पिंपळ,चिंच अशी झाडे लाऊन त्याचे संगोपन सुशोभिकरण(कट्टा,वगेरे) करुन ठेवल्याची जाणीव आज कोवीड काळात प्रकर्षाने जाणवत आहे शिवाय भविष्यात तर ती काळाची गरजच आहे अशी माहीती मयुरी जाधव यांनी देऊन वृक्षारोपणाचा व पुजनाचा सामुहिक कार्यक्रम सुवासिणीनी साजरा केला तसेच पिलीव येथेही वडपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सुरेखा जाधव दामीणी जाधव रोहीणी जाधव, रुपाली अ जाधव,रूपाली हा जाधव,सौ.मंगल देवकर, जयश्री देवकर,शोभा देवकर,पल्लवी देवकर सहभागी होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सुरज जाधव तर आभार स्मिता देवकर यांनी मानले