पिलीव येथील अतुल नष्टे यांची भाजपा तालुका ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड
पिलीव प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अतुल श्रीकांत नष्टे यांची नुकतीच माळशिरस तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माळशिरस येथे आयोजित केलेल्या भाजपच्या बैठकीत भाजपचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य के के पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, बाळासाहेब सरगर, शेळके सर,बाळासाहेब वावरे ,तालुका संघटक सरचिटणीस संजय देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर अतुल नष्टे यांनी भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.