डॉ.रामचंद्र मोहीते यांचा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान ..!

पिलीव/प्रतिनिधी
आज मंगळवार दि 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहीते यांचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे साहेब यांच्या शुभाहस्ते प्रशस्तिपत्र देवून कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थितीत होते.सदरच्या कार्यक्रमाचे पोलिस मुख्यालय सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या बरोबर अहोरात्र काम करणाऱ्या टीमचा तसेच मला आशीर्वाद देणाऱ्या माळशिरस तालुक्यातील जनतेचा असल्याचे डॉ.रामचंद्र मोहीते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *