अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकाम निधी संकलन फेरी आज पिलीवच्या मुख्य पेठेतून.. !
पिलीव/प्रतिनिधी
अयोध्या येथे सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामासाठी आपलाही खारीचा वाटा असलाच पाहिजे या अपेक्षेने पिलीव येथील असंख्य श्रीराम भक्तांनी पिलीव येथील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून श्री गणेश व श्री प्रभू रामचंद्रांची आरती करुन “श्रीराम जय राम जय जय राम” व “श्री प्रभू रामचंद्र भगवान की जय” या जयघोषामध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानास प्रारंभ केला असून पिलीवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सदर अभियानास भसघोस असा प्रतिसाद मिळत आहे.त्याच अणुशंगाने आज रविवार दिनांक २४ जानेवारी रोजी हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून पिलीवच्या मुख्य पेठेतून संकलन फेरी काढण्यात आली.यावेळी पिलीवसह परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.