पिलीव घाटात तुफान दगडफेक,एस टी सुसाट : दरोड्याची अफवा.. !

पिलीव/प्रतिनिधीi

साताराहून सोलापूरकडे निघालेल्या MH – 06 S 8971 या क्रमांकाच्या एसटीवर पिलीव घाटात अज्ञात तरुणांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या असून चालक जिवराज कदम यांच्या डोक्यामध्ये काचा लागल्या असून मोटारसायकलस्वारावरही अज्ञातांनी दगडफेक केल्याने मोटारसायकलस्वारही गंभीर जख्मी झाला आहे.एस टी वर अचानक तुफान दगडफेक झाली मात्र चालकाने एस टी थांबवली नाही.या प्रकारामुळे चालक जिवराज कदम यांनी दरोडा प्रसंगावधान राखत बस सुखरुप घाटाच्या पायथ्याला येवून थांबवली.सदरची घटना कळताच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.परंतु काही उतावळ्या लोकांनी एस टी बसवर दरोडेखोरांनी ताबा मिळवाल्याची वार्यासारखी अफवा पसरवल्याने रात्री परीसरातील लोकांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले होते.यावेळी दगडफेक करणार्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी कोम्बिंग अॉपरेशन सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

https://youtube.com/shorts/_9ucZkZ_mMk

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *