तांदुळवाडी येथील चव्हाण बंधू झाले अवघ्या पन्नास दिवसात पन्नास लाखांचे मालक..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील युवा शेतकरी सुनिल विष्णू चव्हाण व अनिल विष्णू चव्हाण या दोन्हीं भावांनी कलिंगड लागवडीच्या उत्पन्नातून आर्थिक स्त्रोत निर्माण करुन कुटुंबाच्या उत्पन्नात भलतीच भर पाडली आहे.यामुळे त्यांना चांगला आधार मिळाला आहे.त्यांना वडीलोपर्जित एकुण पंधरा एकर जमीन आहे.त्यांच्याकडे विहीर,बोअरवेल असून त्यांना मुबलक पाणी देखील आहे.

ते पारंपारिक पद्धतीने पीके घेतात.यात ऊस,मका,भुईमुंग इतरही पिकांचा समावेश असतो.परंतु त्यांनी यावर्षी नवीन प्रयोग म्हणून शिवनेरी रोपवाटीकाचे मालक बळीराम जाधव व ज्योतीराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेलोडी कलिंगड पिकांची शास्त्रशुध्द पध्दतीने एकुण सहा एकरामध्ये लागवड केली व त्याची व्यवस्थित देखभाल व पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी काळ्यापाटीचे जोमदार कलिंगड पिक घेतले.योग्य नियोजनामुळे त्यांचे कलिंगड आवघ्या 50 दिवसात प्रति नग 7/8 किलो वजनाचे झाले व त्या कलिंडाला 34 रुपये असा प्रति किलो विश्वविक्रमी दर मिळाला.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला भरघोस असा आर्थिक आधार मिळाला असून अवघ्या 50 दिवसात चव्हाण बंधू तब्बल 50 लाखांचे मालक झाले असल्याने सोशल मिडीयासह परिसरामध्ये या चव्हाण बंधूचे ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या मराठी गीतातून कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *