अखेर प्रमोद उर्फ तात्या सावंत या गावगुंडावर गुन्हां दाखल : विकास धाईंजे व वैभव गिते यांचा पारसे यांना दिलासा..!
पिलीव/प्रतिनिधी
मौजे कोळेगाव ता.माळशिरस जि.सोलापूर येथे नामांकित प्रतिष्ठित गोरगरिबांना मदत करणारे शहाजी पारसे सर यांच्यावर जातीयवादी गावगुंडाने जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला.याची माहिती आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास धाइंजे यांना मिळताच एन.डी.एम.जे टीम कोळेगावात दाखल झाली.यावेळी समाजमंदिरात बारा बलुतेदारांनी गावातील अत्याचाराचा पाढाच वाचला.अनेक गंभीर बाबी समोर आल्या.यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास धाइंजे यांनी अत्याचाराच्या विरुद्ध कंबर कसून उभे राहिले पाहिजे.अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तरच तुम्ही व भावी पिढी सुरक्षित राहणार आहे.बाराबलुतेदारांचे ऐक्य हीच तुमची शक्ती आहे.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास जनतेस दिला.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव यांनी सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आरोपीवर कठोर कारवाई करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पुन्हा अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी पोलीस विभागास केली.दरम्यान वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शहाजी पारसे सरांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद उर्फ तात्या अनिल सावंत याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीवर कडक कारवाई करनार असल्याचे सांगितले.यावेळी अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बारा बलुतेदार समाज एकवटल्याचे निदर्शनास आला असून सधूया कोळेगावात तणावपूर्ण शांतता आहे.