भारतातील प्रत्येक गावात अट्रोसिटी अॅकटची माहिती देण्याची गरज- डॉ.सुभाष वाघमारे
पिलीव/प्रतिनिधी
अॅट्रोसिटी अॅकट म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा असून भारतात समता आणि न्याय प्रस्थापित होण्यासाठीची या कायद्याची लोकांना माहिती करून देण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत अस्पृश्यावर होणारया अत्याचारापासून त्यांचे सरक्षण व्हावे ही कायदेशीर मागणी २० नोव्हेंबर १९३० ला केलेली होती.जुलूम,.छळ होऊ नये,बहिष्कार होऊ नये,म्हणूनच पुढच्या काळात अनेक बदल होत अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे.देशातील कोणत्याही जाती जमातीने,व्यक्तीने ,वर्गाने अनुसूचित जाती जमातीवर वर्चस्व गाजवता कामा नये.अत्याचार करू नये म्हणूनच हा कायदा झाला असून अजूनही हा कायदा या जाती जमातीपर्यंत पूर्णपणे पोहचलाच नाही. भारतातील प्रत्येक गावात या कायद्याचा प्रसार केला तर अनेकांचे गैरसमज दूर होतील आणि समतेचे वातावरण तयार होण्याची जाणीव निर्माण होईल.म्हणून भारतातील प्रत्येक गावात अट्रोसिटी अॅकटची माहिती देण्याची गरज आहे असे मत ,समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोलीचे अध्यक्ष डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा प्रसार अभियान सुरु करताना मळोली येथे ते बोलत होते.या वेळी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोलीचे सचिव भीमराव मोरे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात पहिल्या अनुसूचित ५९ जाती व उपजाती आहेत.तसेच दुसऱ्या अनुसूचित ४७ जमाती व उपजमाती आहेत.या प्रत्येक जाती-जमाती पर्यंत हा कायदा अजून पोचलाच नाही .या कायद्यात अत्याचारांचे अपराध सांगितले आहेत.हे अपराध काय आहेत आणि त्यासाठी अपराधाबद्दल शिक्षा काय आहेत हे सर्वांनी समजून घेतले तर अत्याचार होण्याचे प्रमाण कमी होईल.आणि सर्वांनी समतेने राहण्याची व इतरांचा अवमान न करण्याची जाणीव निर्माण होईल.म्हणून या कायद्याची पुस्तके प्रत्येक ग्रामपंचायत .ग्रंथालये,सरकारी सर्व कार्यालये,धार्मिक संस्था ,सेवाभावी संस्था ,प्रत्येक पोलीस स्टेशन इथे असायला हवीत.आपण चुकीचे वर्तन करून अपराध करता कामा नये ही जाणीव निर्माण झाली तर अजून चांगला समाज तयार होईल.अनुसूचित जाती –जमातीतील प्रत्येक घरात हे पुस्तक हवे.लग्न कार्यात आहेर देतो तसे अशा जातीं जमातींनी या कायद्याची पुस्तके एकमेकांना भेट दिली पाहिजेत.अत्याचार झाला असेल तर अत्याचाराची फिर्याद ही फिर्यादीने घटनेनंतर लगेच दिली पाहिजे.खोटी व असत्य माहिती देऊ नये.राजकारणासाठी कोणी उगीच कोणी चिथावणी देऊन फिर्याद दे म्हटले तरी अशी फिर्याद देऊ नये.फिर्यादीत अवास्तव लेखन न करता घटना कशी घडली ते सांगायला हवे.समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक प्रदीप गायकवाड व माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी या कायद्याचे सर्व सुधारणासह पुस्तक तयार केले असून हे पुस्तक प्रत्येकाने घेतले पाहिजे असे ते म्हणाले.राजकीय कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी या पुस्तकाचे वाटप करून समाज जागृती केली पाहिजे.शिक्षकांनी देखील समतेसाठी या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे वाचन करून आपल्या लोकांना जागे करायले हवे.कायदा समाजात चांगले वातावरण तयार व्हावे यासाठी असतो.म्हणून या कायद्याची माहिती घेतल्याशिवाय चुकीची माहिती लोकांना देऊ नये.असेही त्यांनी सांगितले.हा कायदा कोणत्याही जातीच्या विरोधी नसून अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी आहे.अनेक सुशिक्षित म्हणवणारे लोक देखील अभ्यास न करता काहीही खोटे नाटे सांगून कायद्याला विरोध करतात.अत्याचार प्रतिबंधक कायद्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह होय.कायदा कोणी एकाने तयार केलेला नसतो.अत्याचार होऊ नयेत म्हणून कायदे तयार होत असतात.याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे ते म्हणाले.समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे ब्रीद वाक्य ,ज्ञान ,विज्ञान आणि संविधानिक मुल्यांचा प्रसार हे आहे.त्यामुळे कायद्याची माहिती देऊन लोकांना जागरूक करणे हे आपले कर्तव्य आहे जाणीव ठेवून संस्था यापुढे लोकांना अशा अनेक कायद्यांची माहिती देत राहील असे ते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील अनेक गावात निवडक अभ्यासू कार्यकर्ते यांना सदरचे पुस्तक मोफत देऊन हे कायदेविषयक जागृती अभियानचालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले..माळशिरस तालुक्यातील पत्रकार सुजित सातपुते ,महेंद्र धांडोरे ,विलास सुरवसे ,पत्रकार डी.एस .गायकवाड ,महेश धांडोरे .रजनीश बनसोडे ,प्रा.धनंजय साठे ,सुनील [काका ]जाधव , सोमनाथ तोरणे ,उमाजी अण्णा मिसाळ ,महेंद्र साठे ,मिलिंद सरतापे ,चंद्रकांत सरतापे ,प्रा.नरेंद्र भोसले ,अनिल आठवले ,जेष्ठ पत्रकार बी.टी.शिवशरण ,वैभव गीते ,अभिजित गायकवाड ,आदेश गायकवाड ,तुकाराम लोखंडे ,महादेव धांडोरे ,मुकुंद भोसले ,पार्वती वाघमारे ,रोहिणी साठे इत्यादीना भेटी घेऊन अत्याcचार प्रतिबंधक कायद्याची पुस्तके देण्यात आली,