श्री रघुनाथ देवकर यांची सरचिटणीस पदी निवड

पिलीव प्रतिनिधी : अकलूज येथील शिवरत्न बंगला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी च्या विविध सेल च्या पदाधिकारी निवडीचे पत्रवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , माढा लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या पारदर्शक नियंत्रणातून पिलीव तालुका माळशिरस येथील संग्रामसिंह जहागिरदार यांचे समर्थक श्री रघुनाथ गणपत देवकर यांची भारतीय जनता पक्ष माळशिरस तालुका ओ बी सी मोर्चाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याचे पत्र अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ शितल देवी मोहिते पाटील,स्वरुपाराणी मोहिते पाटील,माळशिरस पचांयत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते -पाटील ,माळशिरस पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे , माळशिरस पंचायत समिती चे उपसभापती मा. अर्जुनसिंह मोहिते -पाटील,शंकरराव काकुळे ( माळशिरस तालूका ओ बी सी मोर्चा अध्यक्ष) व भाजपाचे अनेक ज्येष्ठ व युवक मान्यवर उपस्थित होते. सदरचा तालुकास्तरीय नियुक्त्यांचा कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारून पक्षविस्तरासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली. सदर रघुनाथ देवकर यांच्या निवडीचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्रामसिंह जहागिरदार,जि.प.परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते, उपसरपंच संजय आर्वे , संग्रामराजे प्रतिष्ठान विविध संघटना , तरुण मंडळे , स्नेहीमंडळी यांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीवरून अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *